उडदाच्या डाळीची चटणी
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
एका छोट्या लिम्बाएवढी चिंच १/२ वाटी गरम पाण्यात १/२ तास भिजत घालावी. विकत मिळत असलेला चिंचेचा कोळ वापरल्यास तो १/२ टीस्पून घ्यावा. एका कढईत २ टेबल्स्पून तेल गरम करावे. त्यात १०-१२ काढिलिम्बाची पाने टाकावीत. पाने तडतडल्यावर त्यात ३/४ वाटी उडदाची डाळ टाकावी व गुलाबी होईपर्यंत भाजावी. गॅस बंद करावा व त्यात भिजत घातलेली चिंच कोळून घालावी किंव्हा १टीस्पून विकत आणलेला चिंचेचा कोळ घालावा. त्यातच चिंचेच्या दुप्पट गूळ घालावा. चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ घालवे. आता सर्व मिक्सर मधून वाटून काढावे. ही चटणी चवीला आंबट गोड लागते. गोडसर चवीसाठी थोडा जास्त गूळ घातला तरी चालेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा