शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

वाटली डाळ / Watli dal

वाटली डाळ (६ जणांसाठी):

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

एक वाटी हरभऱ्याची डाळ ५-६ तास पाण्यात भिजत घालावी. एका रोळीत उपसून पाण्याने स्वच्छ धुआवी. आता पाणी न घालता, ५-६ हिरव्या मिर्च्या घालून ग्राइण्डर किंव्हा फूड प्रोसेसर मध्ये एकसारखी भरड वाटावी. ग्राइण्डर मध्ये वाटल्यास, फिरविण्यापुरते पाणी घालावयास हरकत नाही.  एका कुकरच्या भांड्यात ओतून कुकर मध्ये एक शिट्टी यॆईपर्यन्त शिजवावी. शिट्टी झाल्यावर लगेच गॅस बंद करावा. कुकर गार झाल्यावर डाळ बाहेर काढावी. शिजलेली डाळ एका ताठलीत गार व्हायला, मोकळी करून पसरून ठेवावी. व गार झाल्यावर हाताने मोठे गोळे मोडावेत. एका कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात २ टीस्पून मोहरी१/२ टीस्पून हिंग व १ टीस्पून हळद, ८-१० कढिलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात गार झालेली डाळ घालावी व गॅस बारीक करावा. सर्व चांगले मिसळावे व चवीप्रमाणे मीठ आणि १ & १/२ टीस्पून साखर घालून २ मिनिटे परतावे. वरून ओले खवलेले खोबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा