बीटरूटची कोशिंबीर:
१ छोटे बीटरूट साल काढून स्वच्छ धुऊन व किसून घ्यावे. त्यात ३ टेबलस्पून दाण्याचे कूट*, चवीप्रमाणे मीठ, १/४ टीस्पून साखर, व ३/४ टीस्पून लिंबाचा रस घालावा. सर्व मिसळावे. ऐन वेळेला १/२ कांदा बारीक चिरून घालावा व सर्व एकत्र कालवावे.
*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दळावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा