शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

बिशीब्याळी भात / Bishibyali Bhat

बिशीब्याळी भात (५ जणांसाठी):

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१ वाटी तांदूळ, व १/२ वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावेत व प्रेशर कुकर मध्ये एकत्रच, ४ वाट्या पाणी घालून मऊसर शिजवावेत. एका छोट्या अर्ध्या लिंबाएवढी चिंच १/२ वाटी पाण्यात भिजत घालावी. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करावे व १ टीस्पून मोहरी१/२ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद, व ७-८ कढिलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात एक उभा चिरलेला चिरलेला कांदा१ साल काढून उभे तुकडे केलॆले गाजर१/२ वाटी दूधभोपळ्याच्या साल काढून फोडी१/२ वाटी डब्बू मिर्चीच्या मोठ्या फोडी, व एका छोट्या बटाट्याच्या साल काढून फोडी, हे सर्व घालावे. एक वाटी पाणी घालून झाकावे व शिजू द्यावे. (कांदा सोडून बाकी सर्व भाज्या मायक्रोवेव मध्ये शिजवून घेतल्या तरी चालतील. तसे केल्यास, कांदा फोडणीत गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतावा व मग शिजलेल्या भाज्या घालाव्यात.) आता त्यात शिजलेले डाळ व तांदूळही घालावेत. गॅस बारीक करावा व त्यात ३ टेबलस्पून बिशीब्याळी मसाला किंव्हा काळा/गोडा मसाला घालावा. वरून वाटल्यास थोडे आणखीन पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ व तिखट  घालावे. छोट्या अर्ध्या लिंबा एवढी चिंच कोळून घालावी. सर्व हलवून एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम खायला द्यावे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा