शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

फ्लावर(Cauliflower) व डब्बूमिर्चीची चटपटीत भाजी / Cauliflower Bhaji

फ्लावर(Cauliflower) व डब्बूमिर्चीची चटपटीत भाजी:

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१ वाटी फ्लावरचे मोठे तुकडे करून घ्यावेत. तसेच १ वाटी डब्बूमिर्ची चे ही मोठे चौकोनी काप करावेत. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून जिरे१/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. त्यावर फ्लॉवरचे तुकडे घालावेत. सर्व हलवून झाकण ठेवावे व एक वाफ अणावी. फ्लावर अर्धवट शिजल्यावर त्यात डब्बू मिर्चीचे तुकडे घालावेत. वरून ३/४"आलं व  १ हिरवी मिर्चीची पेस्ट घालावी. आता परत झाकण ठेऊन दोन्ही, चमच्याने तुकडा मोडता यॆईपर्यंत, शिजवावे. आता १/२ टीस्पून चाट मसाला१/२ टीस्पून लिंबाचा रस, व चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण न ठेवता २ मिनिटे शिजू द्यावे. गरम गरम फुलका किंव्हा पोळीबरोबर खायला द्यावे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा