दही-भात :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१/२ वाटी (४ औंस) मऊसर शिजलेल्या भात घ्यावा व त्यावर ४ टेबलस्पून दही घालून हाताने चांगले कालवून घ्यावे. त्यात १/४ वाटी दूध घालावे व सगळे मिसळावे. एका छोट्या कढईत १ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, ३-४ कढिलिंबाची पाने, व १ वाळलेली लाल मिर्ची घालावी व १ मिनिट बारीक गॅसवर परतावे. ही फोडणी गार झाल्यावर भातावर घालावी. चवीप्रमाणे मीठ घालावे व परत सगळे कालवावे. वरून वाळलेल्या भरल्या मिर्च्या (पर्यायी) तळून, सबंध किंव्हा चुरडून घालाव्यात व गार किंव्हा रूम-टेम्परेचर वर खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा