दूधभोपळ्याची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. दूध भोपळ्याची सालं काढून त्याचे १" x १" मोठे तुकडे करून घ्यावेत.
२. १ वाटी चिरलेल्या दूधभोपळ्यासाठी १ टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, १/४ वाटी पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी.
३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/४ टीस्पून मोहरी घालून ती तडतडू द्यावी. व मग त्यात एक चिमूटभर हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी.
४. त्यात भिजविलेली डाळ व चिरलेला भोपळा घालावा व सर्व मिसळावे.
५. त्यात २ टीस्पून गोडा मसाला / काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ व तिखट, व १ टेबलस्पून गूळ घालावा. १/४ वाटी पाणी घालून सर्व मिसळावे व झाकण ठेऊन फोडी मऊ होईपर्यंत शिजवावे.
६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
७. दूधभोपळ्याची भाजी पोळी किंव्हा फुलक्याबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा