व्हेजिटेबल उत्तप्पम / उत्तप्पा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. उत्तप्प्याचे पीठ बनवायला डोस्याच्या पिठाचीच कृती वापरावी.
२. पुढे दिलेल्या कुठल्याही किंव्हा सर्व भाज्या तयार ठेवाव्यात : कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, डब्बू मिर्ची, कोथिंबीर, सर्व बारीक चिरून घ्यावे. गाजर सालं काढून किसून घ्यावे. मटारचे दाणे मिक्रोवेव मधे शिजवून घ्यावेत.
३. तवा गरम करून त्याच्या मधोमध १/४ टीस्पून तेल पसरावे व त्यावर ४ टेबलस्पून पीठ घालावे. एका पळीने पीठ गोल गोल पसरावे व गोल आणि १/२ सें. मी. जाड उत्तप्पा पसरावा. गॅस बारीक ठेवावा.
४. त्यावर आपल्या आवडीच्या भाज्या पसराव्यात व उलतन्याने हलकेच दाबून भाज्या पिठात पेराव्यात.
५. कडेने १/२ टीस्पून तेल सोडावे व झाकण ठेऊन पिठाचा ओलसरपणा जाईपर्यन्त शिजू द्यावे. मात्र गॅस बारीक ठेवावा म्हणजे खालचा भाग करपणार नाही व उत्तप्पा आतपर्यंत शिजेल.
६. दुसऱ्या बजूस उलटून टाकावे. उलातन्याने किंचित दाबून एखादा मिनिट झाकण न ठेवता शिजू द्यावे.
७. भाज्यांची बाजू वर करून, थोडी मोळगापोडी पसरावी व गरम गरम उत्तप्पा नारळाची चटणी व सांभार किंव्हा रसम बरोबर वाढावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा