घेवड्याची भाजी / Ghewdyachi bhaji / Stir Fry Valor Beans
घेवड्याची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. २ वाट्या घेवड्याच्या शेंगा शिरा काढून निवडून घ्याव्यात.
२. स्वच्छ धूऊन बारीक चिराव्यात.
३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी.
४. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून सर्व मिसळावे. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून धन्याची पूड, १/२ टीस्पून जिऱ्याची पूड, व १/२ टीस्पून साखर घालावी व सर्व मिसळावे.
५. झाकण ठेऊन मंद आचेवर शेंगा पूर्ण शिजू द्याव्यात व मग गॅस बंद करावा. मधे मधे हलवायला विसरू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा